जालन्याच्या वेदांत सचिन हिंगोले ला जागतिक बुद्धिबळ संघटनेचे (FIDE) आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त झाले.

पुणे येथे हलकुडे चेस फेस्टिवल दि. १३ ते १७ मे २०२३ दरम्यान पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत वेदांत ने ३ पैकी २ आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन खेळाडूंसोबत बरोबरी तर १ खेळाडू वर मात करून स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे वेदांत ला ऑगस्ट २०२३ फिडे रेटिंग लिस्ट मध्ये वेदांत ला
FIDE INTERNATIONAL RATING १०३५ (जुलै – ऑगस्ट २०२३ फिडे RATING LIST) प्राप्त झाले.

वेदांत ला ग्लोरियस चेस अकॅडमी जालना प्रशिक्षक श्री. सतीश ठाकूर (फिडे आंतरराष्ट्रीय पंच) व प्रशिक्षक श्री. कृष्णा ठाकूर (फिडे आंतरराष्ट्रीय पंच) यांचे प्रशिक्षण लाभले आहे.

यावेळी जालना जिल्हा बुद्धिबळ संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दयानंदजी भक्त, प्रा. डॉ. श्याम काबुलीवाले, प्रा. डॉ. रत्नाकर कुलकर्णी, प्रा. डॉ. जगताप, आदींनी वेदांत चे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शूभेच्छा दिल्या.